Tuesday, July 9, 2024

‘तुम्ही दिलेली साडी नेसतेय’, म्हणत अभिनेत्री विशाखा सुभेदाराने नेसली लता दीदींनी भेट म्हणून दिलेली साडी

आज लता मंगेशकर यांची पहिली पुण्यतिथी. आजच्या दिवशी २०२२ साली लता दीदींनी या जगाचा निरोप घेतला होता. आज एक वर्ष होऊनही कोणीच त्यांना विसरू शकलेले नाही. लता दीदींनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कायम दुसऱ्याचे कौतुक केले आणि त्याला प्रोत्साहित केले. त्यांनी कधीही मीडियासाठी किंवा कॅमेऱ्यासाठी काम केले नाही. चित्रपट, टीव्ही, खेळ, सामाजिक आदी अनेक क्षेत्रातील लोकांच्या कामाचे त्या सतत कौतुक करायच्या आणि त्यांना काहीतरी आशीर्वाद सामान भेट पाठवायच्या. असे त्यांनी अनेकांच्या बाबतीत केले होते. अशीच एक भेट मिळाली होती मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या विशाखा सुभेदार हिला. विशाखाने एक विनोदी अभिनेत्री म्हणून नावलौकिक कमावला. अनेक विनोदी शो केल्यानंतर ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये दिसू लागली. या शोमध्ये तिने अनेक उत्तमोत्तम स्किट सादर केले. असेच तिचे एक स्किट होते ज्यात तिने उर्दू गायिका असलेले एक पात्र साकारले होते. यामध्ये तिने समीर चौगुलेंसोबत स्किट सादर केले. त्यानंतर जे घडले ते केवळ अविश्वसनीय होते.

लता मंगेशकर यांना महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो खूप आवडायचा. त्या नेहमीच हा शो पाहायच्या. समीर आणि विशाखा यांचे ते स्किट सादर झाल्यानंतर लता दीदींनी समीर आणि विशाखा या दोघांना आशीर्वाद स्वरूप एक भेट पाठवली होती. यात त्यांनी विशाखासाठी दोन साड्या पाठवल्या होत्या. लता दीदींच्या पहिल्या पुण्यतिथी निमित्ताने विशाखाने त्यांनी दिलेली साडी परिधान एक तिचा एक फोटो आणि त्या साडीच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. विशाखाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले,

 

View this post on Instagram

 

A post shared by Vishakha Subhedar (@subhedarvishakha)

“आज हा फोटो माझा नाही तर ह्या मी नेसलेल्या साडीचा आहे…हे वस्त्र नाही हा आशीर्वाद आहे..भारतरत्न, गानकोकिळा. लता मंगेशकर.. ह्यांचा.

हास्यजत्रेमधलं उर्दू गायिका, हे पात्र निभावलेले ते स्किट त्यांना प्रचंड आवडलं, त्या म्हणाल्या तू उर्दू बोललीयस ते फार छान बोललीयस.. मी सुद्धा अनेक उर्दू शब्द गायलेयत,त्यांचे उच्चार अवघड असतात. तू खरच खुप छान जमवलंस. आणि त्यांनीही नाटकात काम केलं त्या वेळेस झालेली गंमत देखील सांगितली.त्यांनी शाबासकी म्हणून हा आशीर्वाद दिला. covid प्रकरण निवळलं किं आम्ही भेटायला जाणार होतो पण… दुर्दैव.राहून गेलं.
त्या आपल्यात नाहीयत पण त्यांचा आवाज आपल्याला जिवंत ठेवतो..! अंगाई ते म्हातारपण सगळ्या वयाशी त्यांचा आवाज त्यांची गाणी connect होतात. आणि त्या सर्वश्रेष्ठ बाईंचा, लतादीदींचा,आम्हाला फोन आला..!

त्यांनी फोन वर केलेल्या गप्पा आजही माझ्या कानात आहेत.. तो दिवस न विसरण्यासारखा होता. ही साडी अंगावर नेसताना काय वाटत होत ते मी शब्दात नाही सांगू शकत..देवाचे आभार मानले, लताबाईंचे नाव घेतले त्यांना सांगितलं “तुम्ही दिलेली साडी नेंसतेय.”आणि Samir Choughule , Sachin Mote, Sachin Goswami हास्यजत्रेचे Amit Phalke चे सुद्धा आभार मानले.ह्या सगळ्यांमुळेच हे आशीर्वाद रुपी वस्त्र मला मिळाले.
आज लतादीदींचा स्मृतीदिन…”.

लता मंगेशकर यांनी नेहमीच त्यांच्या सध्या आणि निर्मळ स्वभावाने सर्वांची मने जिंकली. केवळ मनोरंजन नाही तर संपूर्ण इतर क्षेत्रांमधून दिग्गज सामान्य लोकं त्यांना आठवत त्यांच्या स्मृतींना उजाळा देत आहे. लता मंगेशकर हे असे नाव आहे, जे जगाच्या अंतापर्यंत सर्वांच्या तोंडी असेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शेखर सुमनने प्रियंका चौधरी अन् एमसी स्टॅनवर केला रॅप, स्पर्धक हसून हसून लाेटपाेट

सुकेशने तुरुंगातून पुन्हा लिहिले पत्र; म्हणाला, ‘मी चाहत खन्नासारखा गोल्ड डिगर …’

हे देखील वाचा