Wednesday, August 13, 2025
Home मराठी ‘लज्जा से मरे रे जिया…!’, कॉमेडीचा तडका लावणाऱ्या विशाखा सुभेदारच्या अदांनी वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

‘लज्जा से मरे रे जिया…!’, कॉमेडीचा तडका लावणाऱ्या विशाखा सुभेदारच्या अदांनी वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

विनोद हा आपल्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. टेलिव्हिजनवर अनेक विनोदी शो आहेत. पण सुरुवातीला विनोदी शोमध्ये केवळ पुरुष दिसायचे. तर आता महिलांचा देखील विनोदी शोमध्ये सक्रिय सहभाग झाला आहे. अनेक महिला देखील पुरुषांच्या बरोबरीने आज विनोदी क्षेत्रात काम करत आहेत. यातीलच एक आघाडीची विनोदी अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार होय. तिच्या विनोदी अभिनयाने तिने सर्वांना आपलंस केलं आहे. तिच्या विनोदाचा टायमिंग, हावभाव प्रेक्षकांना आकर्षित करतात. अशातच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

विशाखा सुभेदाराने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने ‘कभी निम निम’ या गाण्यावर हावभाव देत डान्स केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विशाखाने अप्रतिम हावभाव देत आहे. तिचे हे हावभाव तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहे. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. हा व्हिडिओ शेअर करून तिने एक कॅप्शन देखील दिले आहे. तिने लिहिले आहे की, “लज्जा से मरे रे जिया.” तिचे चाहते कमेंट करत आहे की, “समीर कुठे गेले आहेत.” तसेच अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने देखील या व्हिडिओवर कमेंट केली आहे. तिच्या या अदा सर्वांनाच आवडल्या आहेत. त्यामुळे तिचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

विशाखाने अनेक चित्रपटात तसेच मालिकांमध्ये विनोदी पात्र निभावले आहे. तिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ‘तिने सासूचे स्वयंवर’, ‘सासूबाई गेल्या चोरीला’, ‘दगडाबाईची चाळ’, ‘१२३४’, ‘ये रे येरे पैसा’, ‘६६ सदाशिव’ ‘मस्त चाललंय आमचं’, ‘येड्यांची जत्रा’, ‘अरे आवाज कोणाचा’, ‘झपाटलेला २’, ‘बालक पालक’. ‘फक्त लढा म्हणा’, ‘सुपर नानी’, ‘हृदयानंतर’, ‘दुलदस्ता’ यासारख्या चित्रपटात काम केले आहे. तसेच ती सध्या ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कॉमेडी शोमध्ये काम करत आहे. (vishakha subhedar’s dance video viral on social media)

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस ओटीटी’ फेम अक्षरा सिंगचं नवं गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला; अल्पावधीतच मिळाले तब्बल ‘इतके’ व्ह्यूज

-एअरपोर्टवर कुटूंबासह स्पॉट झाली करीना, पाहायला मिळाला चिमुकल्या तैमुर अन् जेहचा गोंडस अंदाज

-भारीच ना! अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’नंंतर आता कंगना रणौतचा ‘थलायवी’ देखील होणार चित्रपटगृहात प्रदर्शित

हे देखील वाचा