Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

निधनाच्या दोन दिवस आधी झाली होती सिध्दार्थ अन् विशालची भेट; संभाषण ऐकून तर तुम्हालाही आवरणार नाहीत अश्रु

‘बिग बॉस १३’चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन होऊन दहा दिवस झाले आहेत. तरीही अनेक कलाकार आणि त्याचे चाहते अजूनही या दुःखातून स्वःताला सावरू शकलेले नाही. सिद्धार्थचे अवख्या ४०व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्या जाण्याने अनेकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याची आई रीता शुक्ला प्रचंड दुःखी झाल्या आहेत. सिद्धार्थच्या निधननंतर त्याची मैत्रीण शहनाझची प्रकृती खूप खराब झाली आहे. त्यामुळे अनेक चाहते तिच्या प्रकृतीची विचारपूस करण्याचा प्रयत्न करत आहेत. सिद्धार्थला शेवटचा निरोप देताना शहनाझचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेच सिद्धार्थ गेल्यापासून शहनाझ मूक व्यक्तीसारखी जगू लागली आहे.

दिवंगत अभिनेता सिद्धार्थ आणि विशाल आदित्यची शेवटची भेट
बाॅलिवूड इंडस्ट्रीतील कलाकार हळूहळू सिद्धार्थशी संबंधित गोष्टी सांगत आहेत. अलीकडेच, ‘बिग बॉस १३’चा स्पर्धक विशाल आदित्य सिंगने माध्यमांशी बोलताना सांगितले की, सिद्धार्थच्या मृत्यू फक्त दोन ते तीन आधी दिवस त्यांची भेट झाली. तसेच सिद्धार्थसोबत त्याची ही शेवटची भेट असेल, याची त्याला कल्पना नव्हती. सिद्धार्थ आणि विशाल यांच्यात ‘बिग बॉस’ शोमध्ये अनेक वेळा भांडण झाले होते. विशाल अनेकदा सिद्धार्थच्या विरोधात असलेल्या संघाचा एक भाग होता. अशा स्थितीत अनेकदा दोघांमध्ये छोट्याश्या गोष्टीवरून दुरावा निर्माण होत असे.

विशालने सांगितले की, शो संपल्यानंतरही दोघांमधील वाद बंद होते नव्हते, पण ‘खतरों के खिलाडी ११’ मधील त्याचे काम पाहून सिद्धार्थने कुठून तरी त्याचा नंबर शोधून काढला होता. विशाल म्हणाला की, “सिद्धार्थला कुठे तरी नंबर सापडला आणि आम्ही दोघे सुमारे अर्धा तास फोनवर बोलत होतो. नंतर, सिद्धार्थने मला सांगितले की, आपण लवकरच भेटू आणि यानंतर दोघांची आमच्या दोघांची भेट झाली.” सिद्धार्थ आणि विशालची ही भेट शेवटची भेट ठरली. पण विशाल अजूनही या घटनेनंतर शॉकमध्ये आहे.

विशाल पुढे बोलताना म्हणाला की, “सिद्धार्थची आई आणि बहीण ‘खतरों के खिलाडी’मध्ये माझा स्टंट पहात होत्या. त्यावेळी मी पाण्यात पोहत होतो. मात्र, कसे पोहतात हे माहित नव्हते. त्याचवेळी सिद्धार्थने मला बोलावून माझ्या धाडसाचे कौतुक केले. सिद्धार्थ म्हणाला होता की,विशाल तू जे केलेस ते मी कधीच करू शकत नाही. मला असे वाटते की, अशाच लोकांनी जगात राहावे, जे इतरांना खूप प्रोत्साहन देतात.”

तसेच तो पुढे म्हणाला की, “आम्ही फोनवर बोलल्यानंतर भेटलोही. पण मला वाटले नव्हते की, सिद्धार्थ असा अचानक सर्वांना सोडून जाईल. जेव्हा त्याच्या मृत्यूची बातमी फक्त दोन -तीन दिवसांनी समोर आली तेव्हा मला धक्का बसला होता आणि मी अजूनही शॉकमध्ये आहे.”

सिद्धार्थने बिग बॉसचे विजेतेपद पटकावले होते, पण तो विजय मिळवण्यासाठी त्याला प्रचंड गोष्टींचा सामना करावा लागला होता. शहनाझ वगळता बहुतेक स्पर्धकांनी सिद्धार्थसोबत शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली होती. विशाल आणि सिद्धार्थने तर पार बोलणेही बंद केले होते, पण हे सिद्धार्थच्या जाण्याने सर्वच कलाकार आणि स्पर्धकही दुखावले गेले आहेत. सिद्धार्थचा मृत्यू गुरुवारी (२ सप्टेंबर) रोजी झाला आणि शुक्रवारी (३ सप्टेंबर ) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मामा-भाच्याचे नातं इतकं कसं बिघडलं? जाणून घ्या कृष्णा अभिषेक आणि गोविंदामधील वादाच कारण

-पहिलीपासून लपून दुसऱ्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी ‘दबंग खान’ने चक्क बदलले होते स्वतःचे दात; मजेदार आहे तो किस्सा

-काय सांगताय! बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला ‘या’ गोष्टीची वाटतेय भीती, करण जोहरने केला खुलासा

हे देखील वाचा