Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

Happy Birthday | अत्यंत हलाखीचं होतं बालपण, शाळेची फी भरायलाही विशालकडे नसायचे पैसे

अभिनेता विशाल कोटियान (Vishal Kotian) त्याच्या बिंनधास्त आणि रोखठोक वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या अनेक विवादास्पद बोलण्याने तो नेहमीच चर्चेचा विषय असतो. विशालने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे. त्याच्या दमदार अभिनयाचे असंख्य चाहते आपल्याला पाहायला मिळतात. रविवारी (१३ फेब्रुवारी) विशाल त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊ या त्याच्या प्रवासाबद्दल.

आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या विशालचे संपूर्ण बालपण मुंबईमध्ये गेले. त्याने आपले शैक्षणिक शिक्षण मुंबईच्या फातिमा विद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर त्याने डॉन बॉस्को कॉलेजमधून आपले पदवीचे शिक्षण घेतले. सध्या यशाच्या शिखरावर असलेल्या विशालचे बालपण मात्र अत्यंत हलाखीत गेले आहे. अनेक अडचणींचा सामना करत त्याने हे यशाचे शिखर गाठले आहे.

लहानपणी विशाल एका चाळीत राहायचा तिथूनच त्याने आपल्या आयुष्याचा प्रवास सुरू केला. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. एका कार्यक्रमात बोलताना त्याने आपल्या बालपणीच्या या बिकट परिस्थितीचे वर्णन केले होते. यावेळी तो म्हणाला की, “मी अत्यंत गरीब परिस्थितीतून या ठिकाणी आलो आहे. त्यावेळी माझ्याकडे घालायला चांगले कपडे नव्हते. माझ्या आई वडिलांनी मला चांगल्या शाळेत घातले त्यामुळेच माझे शिक्षण पूर्ण झाले.” याबद्दल पुढे बोलताना त्याने सांगितले की, “त्या काळात माझ्याकडे फी सुद्धा भरण्याइतके पैसे नव्हते. माझी आई कित्येक दिवस जेवण करत नसायची. भात शिजवला तर ती फक्त त्यामधले पेज प्यायची आणि आम्हाला भात खायला द्यायची. इतक्या बिकट परिस्थितीतून मी आलो आहे.”

हेही पाहा- सलमान सोबत बॉलिवूड मध्ये केलेले पदार्पण, मात्र सध्या विकेतेय घरोघरी जेवणाचे डब्बे | Pooja Dadwal

अभिनेता विशाल कोटियान या क्षेत्रात येण्याआधी एक मॉडेल म्हणून काम करत होता. त्यानंतर त्याने हळूहळू अभिनय क्षेत्राकडे मोर्चा वळवला. प्रसिद्ध टीव्ही कार्यक्रम ‘अकबर का बल बिरबल’ या कार्यक्रमात विशालने भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. त्याने अभिनयाचे धडे धडे घेतले होते. विशालने अनेक कार्यक्रमात काम केले आहे. ज्यामध्ये ‘देवो के देव महादेव’ सारख्या लोकप्रिय कार्यक्रमांचा समावेश आहे. या मालिकेत त्याने हनुमानाची भूमिका साकारली होती. या भूमिकेने त्याला चांगली लोकप्रियता मिळवून दिली.

हेही वाचा –

हे देखील वाचा