Tuesday, April 15, 2025
Home टेलिव्हिजन सलमान खानसारखी बॉडी करायला कष्ट घेतोय विशाल कोटियन; म्हणाला, ‘मी १६ तास उपाशी…’

सलमान खानसारखी बॉडी करायला कष्ट घेतोय विशाल कोटियन; म्हणाला, ‘मी १६ तास उपाशी…’

हिंदी मनोरंजन जगतातील कलाकारांच्या फिटनेसची, त्यांच्या सिक्स पॅकची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होताना दिसत असते. कलाकारांच्या या फिटनेस फंडयाची त्यांच्या चाहत्यांमध्येही प्रचंड उत्सुकता लागलेली असते. अशीच चर्चा सध्या टिव्ही अभिनेता विशाल कोटियनची (Vishal Kotian) होताना दिसत आहे. विशाल कोटीयन सध्या त्याच्या थक्क करणाऱ्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनमुळे नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. नक्की काय आहे त्याचा फिटनेस फंडा याचा खुलासा खुद्द अभिनेत्यानेच केला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

विशाल कोटियन हा लोकप्रिय टिव्ही अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि भूमिकांमुळे त्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या विशाल कोटियन त्याच्या सिक्स पॅकमुळे सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचा हा बदललेला फिटनेस पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. त्यामुळेच त्याचे चाहते त्याला फिटनेस मंत्राचा विचारताना दिसत आहेत. चाहत्यांच्या या मागणीचा विचार करत अभिनेता विशाल कोटियनने त्याचा फिटनेस मंत्र चाहत्यांना सांगितला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by VISHAL KOTIAN (@vishaalkotian)

 

आपल्या फिटनेसबद्दल बोलताना विशालने सांगितले की, “माझा फिट राहण्याचा फंडा खूपच सोपा आहे.चांगला आहार आणि व्यायाम हेच माझ्या निरोगी आयुष्याचे तसेच फिटनेसचे रहस्य आहे. इतकेच नव्हेतर जिमबरोबरच मी १६ १६ तास उपाशीही राहतो. तसेच मी डायटिंग आणि व्यायामावर जास्त विश्वास ठेवत नाही. मी नेहमीच माझ्या शरीरातील कॅलरी मोजत असतो आणि त्यानुसार माझा व्यायाम आणि डाएट ठरवत असतो,”

याबद्दल बोलताना विशालने पुढे सांगितले की, “मी कधीही माझ्या आवडीच्या डिशचा त्याग करत नाही. फक्त मीच नव्हेतर कोणीही आपल्या आवडीचे खाणे सोडू नये. घरी केलेले जेवण असो किंवा बाहेरचे जेवण असो कधीही सोडू नये. मी माझे जेवण घेताना कॅलरीचा सर्वात जास्त विचार करतो आणि माझ्या आहाराप्रमाणे त्यात बदल करत जातो. अभिनेता विशालच्या सांगण्यानुसार तो सोळा सोळा तास उपाशी राहू शकतो,” याबद्दल त्याने सांगितले की, मी ७७ किलो चा आहे, त्यामुळे मला १५० ग्राम प्रोटीनची जरुरत आहे. आणि हे फक्त डाएट करुन शक्य होत नाही. त्यामुळेच मी प्रोटीन आणि सप्लीमेंट घेतो. मी ७, ८ नंतर जेवण करत नाही तसेच माझ्या जेवणात १६ तासाचे अंतर ठेवतो. दरम्यान या सगळ्या फिटनेससाठी तो अभिनेता सलमान खानला गुरू मानत असल्याचेही त्याने सांगितले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा –

‘डेढ फुटिया’ भूमिका गाजवणाऱ्या नार्वेकरांचे साठीत पदार्पण, बॉलिवूडमध्येही सोडली अभिनयाची छाप

पन्नाशीतही मैफील लुटतेय कृष्णा अभिषेकची बायको, स्विमिंग पूलकिनारी बिकिनीतच लावले ठुमके

राखीने इंजेक्शन देणाऱ्या नर्सला प्रश्न विचारताच नेटकऱ्याची कमेंट चर्चेत; म्हणाला, ‘सुई आत, बूस्टर बाहेर

 

 

 

 

हे देखील वाचा