Tuesday, October 28, 2025
Home मराठी ‘ही बाई शहाणी नाहीये,’ कोणाबद्दल बोलतायेत सोनाली अन् विशाल? ‘बिग बॉस’च्या घरात रंगणार नवा खेळ

‘ही बाई शहाणी नाहीये,’ कोणाबद्दल बोलतायेत सोनाली अन् विशाल? ‘बिग बॉस’च्या घरात रंगणार नवा खेळ

खरंतर आयुष्यात आपल्याला ज्या काही गोष्टी दिसतात त्या तशाच नसतात. परंतु ‘बिग बॉस’चे घर असे आहे, जिथे दिसतं तसंच असतं. या घरात आल्यावर अनेकांच्या चांगुलपणाचा बुरखा उतरतो. घरात अनेक गेमप्लॅन केले जातात. अनेक सदस्यांविरोधात कट रचले जातात. या वातावरणानुसार सगळ्यांना तसंच राहावं लागतं. अशातच ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात चांगलेच वाद रंगात आले आहेत. दुसऱ्या आठवड्यात ‘बिग बॉस’ने ‘बेडी की जोडी’ ही थीम ठेवली आहे. तसेच ‘हल्ला बोल’ हे साप्ताहिक कार्य ठेवले आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात पहिल्यांदाच टीमविरुद्ध टीम खेळणार आहे. या खेळातील पहिलाच दिवस झाला आहे. पहिल्याच दिवशी टीममध्ये भांडण झाल्याचे दिसून आले.

या टास्कमध्ये गार्डन एरियामध्ये एक गाडी ठेवलेली असते दुसऱ्या टीममधील स्पर्धकांना गाडीवर बसलेल्या स्पर्धकांना काहीही करून उठण्यास प्रवृत्त करायचे आहे. यावेळी दुसऱ्या टीममधील स्पर्धक सुरेखा आणि सोनालीच्या अंगावर साबणाचे पाणी तसेच अंडी फोडतात. यानंतर दोन टीममध्ये जोरदार भांडण झाल्याचे दिसून आले आहे. (Vishal nikam and sonali patil gausiping about leady, let’s know in upcoming episode)

यानंतर विशाल सोनालीला एक मोलाचा सल्ला देताना दिसणार आहे. टास्कमध्ये मीरा, गायत्री आणि जय हे विशाल आणि सोनाली यांच्या टीममधील स्पर्धकांना त्रास देताना दिसले. परंतु यावर सोनालीने शांतपणे हा टास्क केला. तिने कोणतीही तक्रार केली नाही. या टास्कनंतर रात्री सोनाली विशालला तिच्या मनातील काही गोष्टी सांगताना दिसली. सोनाली विशालला सांगते, “टेंशन वाढवून ठेवलं आहे, ही बाई शहाणी नाहीये. मेंटल टॉर्चर करते.”

यावर विशाल तिला म्हणतो की, “तू टॉर्चर नको होऊस. तू कोणालाही बांधील नाहीयेस. तुला अक्कल आहे का? टास्कमध्ये तुझं काम होतं, तिकडच्या पोरांना खिळवून ठेवणं. सगळेजण तिच्यावर भिडत होते. आम्हाला माहिती आहे की, तुझी मेंटल परिस्थिती काय आहे. आम्ही समजून घेऊ. पण बाहेर प्रेक्षकांना काय दिसत असेल, सोनाली पाटीलने पहिल्या आठवड्यात नखरे केले आणि दुसर्‍या आठवड्यात फूलडाऊन. तू मधे कुठेच दिसत नाहीस. विकासला देखील तुला हेच सांगायचं आहे. मी काळजीपोटी सांगतो आहे. तुला कळलं आहे ना मग काही फरक पडत नाही”.

आता विशाल आणि सोनाली नक्की कोणाबाबत बोलत आहेत. हे आपल्याला बुधवारी (२९ सप्टेंबर) रात्री ९: ३० वाजता पाहायला मिळणार आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

बॉलिवूडचे ‘हे’ मोठे सिनेमे ठरले नुसताच फुसका बार, कमाईतून बजेट वसूल करणे देखील झाले मुश्किल

बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्रींनी लग्नानंतर त्यांच्या यशस्वी चित्रपटांच्या करिअरला ठोकला रामराम

प्रायव्हेट जेटमध्ये मांडी घालून बसलेल्या प्रियांका चोप्राचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले, ‘खरी देसी गर्ल’

हे देखील वाचा