Saturday, June 29, 2024

विष्णू विशाल आणि ज्वाला गुट्टा चढणार लग्नाच्या बोहल्यावर? अभिनेत्याने केली मोठी घोषणा

तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार विष्णू विशाल त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या अदाकारीने आणि दमदार बॉडीने प्रेक्षकांमध्ये चर्चेत असतो. त्याच्या गुड लूक्समुळे मुलींमध्ये त्याची खूपच क्रेझ आहे. त्याचा जन्म 17 जुलै 1984 मध्ये झाला होता. क्रिकेटमध्ये करिअर केल्यानंतर त्याने ‘वेन्निला कबड्डी कुझु’ या स्पोर्ट्स सिनेमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

मागच्याच वर्षी त्याने प्रेक्षकांना ही गोड बातमी दिली होती की, त्याने आणि त्याची गर्लफ्रेंड ज्वाला गुट्टा यांनी 7 सप्टेंबर रोजी साखरपुडा केला. ही बातमी ऐकून त्याच्या सगळ्या चाहत्यांना असे वाटत होते की, त्या दोघांनीही लवकरच लग्न करावे. तो त्याच्या चाहत्यांची ही इच्छा पूर्ण करताना दिसत आहे. त्याने सगळ्यांना सांगितले आहे की, तो लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

माध्यमांसोबत बातचीत करताना विष्णूने सांगितले की, “मी आणि ज्वाला लवकरच लग्न करणार आहोत. यामुळे मी खूपच आनंदी आणि उत्साहित आहे. लवकरच लग्नाची तारीख देखील जाहीर करणार आहे.” यासोबतच विष्णूने सांगितले की, ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ज्वाला नेहमीच त्याच्यासोबत असायची. यासाठी त्याने एक पोस्ट करून तिचे आभार देखील मानले आहे.

ज्वाला गुट्टा ही एक बॅडमिंटनपटू आहे. तिचे विष्णूसोबत हे दुसरे लग्न असणार आहे. चेतन आनंदसोबत तिने 2005 मध्ये लग्न केले होते. पण त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही, आणि 2011 मध्ये त्या दोघांचा घटस्फोट झाला. तसेच विष्णूचा देखील घटस्फोट झाला आहे. 2011 मध्ये त्याने रजनी नटराजसोबत लग्न केले होते. पण काही वैयक्तिक कारणामुळे त्यांचा घटस्फोट झाला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एक दिवस ‘त्या’ दिग्दर्शकाने कंगनाला एका कॅफेमध्ये पाहिले, अन् स्ट्रगलर कंगनाला पहिला रोल मिळाला

-एकेवेळी सिगारेटच्या प्रचंड आहारी गेलेले बॉलीवूड कलाकार, आज समाजासाठी झालेत आदर्श व्यक्ती

-अज्ञात व्यक्तीने केली जॉनी डेपच्या घरात घुसखोरी, दारुचे घोट आणि बाथरुममध्ये घेतली आंघोळीची मजा

हे देखील वाचा