‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमाला मिळालेल्या दमदार प्रतिसादानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या पुढच्या प्रोजेक्टवर काम करण्यास सुरुवात देखील केली आहे. ९० च्या दशकात काश्मीरमध्ये झालेल्या काश्मीर पंडितांच्या नरसंहारावर आधारित असलेल्या ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमाने बक्कळ कमाई करत प्रेक्षकांची मने जिंकली. नुकतेच एका मुलाखतीमध्ये विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या आगामी ‘द दिल्ली फाईल्स’ सिनेमाबद्दल भाष्य केले आहे. विवेक यांनी मुलाखतीमध्ये सांगितले की, त्यांचा हा आगामी सिनेमा फक्त दिल्लीबद्दल नसून, यात असे दाखवले जाईल की, कित्येक वर्षांपासून दिल्ली भारताला नष्ट करत आहे.
विवेक यांनी पुढे सांगितले की, “‘द दिल्ली फाईल्स’ सिनेमातून तुम्हाला तामिळनाडूबद्दल बऱ्याच गोष्टी उलगडल्या जाणार आहे. हा सिनेमा दिल्लीबद्दल नसून यात दिसणार आहे दिल्ली किती वर्षांपासून भारताला बर्बाद करत आहे. दिल्लीमध्ये देशावर कोणी राज्य केले? कसे मुघल राजा आणि इंग्रजांपासून आधुनिक काळापर्यंत सर्व धुळीस मिळवले गेले. इतिहास हा नेहमीच पुरावे आणि सत्य गोष्टींवर आधारित असला पाहिजे. अशा गोष्टी आधारित नसाव्या.”
Chennai | Delhi files will tell you lots of truth about Tamil Nadu also. It's not about Delhi, it just showed how Delhi has been destroying 'Bharat' for so many years…: Film director Vivek Agnihotri pic.twitter.com/ly4xXyuZCP
— ANI (@ANI) April 17, 2022
विवेक पुढे म्हणाले, “भारतात ही समस्या आहे की, खूप लोकं इतिहासाला भारताच्या राजकीय अजेंड्यावर लिहितात. भारतात बहुतकरून वेस्टर्न सेकुलर अजेंडा राहिला आहे. यासाठीच हिंदू सभ्यतांना नेहमीच नजरअंदाज केले गेले. असे मानले गेले की, आपण कमजोर आहोत आणि आपण जे काही शिकलो ते सर्व वेस्टर्न संस्कृतीवर आधारित आहे. यासाठीच हे चुकीचे आहे.”
तत्पूर्वी विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमाला दिग्दर्शित करण्यासोबतच त्याचे लेखनही केले आहे. अतिशय छोट्या बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने तब्ब्ल २५० कोटींचा गल्ला कमावला आहे. अनुपम खेर, पल्लवी जोशी, मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, मिथुन चक्रवर्ती, प्रकाश बेलावड़ी, दर्शन कुमार, भाषा सुंबली, पुनीत इस्सर आदी कलाकार चित्रपटात मुख्य भूमिकेत होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-