Saturday, June 29, 2024

‘गर्व, लाइफस्टाइलमध्ये पैसा…’ चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून विवेक अग्निहोत्री यांनी साधला सुपरस्टार्सवर निशाणा

द काश्मीर फाइल्स या सिनेमाने २०२२ या वर्षात कमाल दाखवत बॉक्स ऑफसवर बक्कळ कमाई केली. या सिनेमाच्या निमित्ताने अनेक लोकांच्या नावाची चर्चा झाली आणि अनेकांना या सिनेमाने एक नवीन ओळख आणि एक नवीन नावलौकिक मिळवून दिला.यातलेच एक नाव म्हणजे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री. विवेक अग्निहोत्री हे सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात असतात आणि त्यांचे विचार मांडत असतात. ते त्यांच्या विचारांमुळे अनेकदा ट्रोलिंगला देखील सामोरे जातात मात्र तरीही ते पोस्ट करणे कमी करत नाही.

आता पुन्हा एकदा ते त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. नुकताच अजय देवगणचा ‘भोला’ सिनेमा प्रदर्शित झाला , मात्र सिनेमाने अपेक्षेपेक्षा कमी यश मिळवले आणि कमाईच्या बाबतीत देखील तो, मागे पडला. यातच आता इशारा इशाऱ्यांमध्ये विवेक यांनी हिंदी चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर निशाणा साधत त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केले आहे.

विवेक यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “बॉलिवूड पुन्हा एकदा एका वाईट काळात गेले आहे. असे झाले आहे की, इंडस्ट्री अशा कलाकारांवर पैसा लावत आहे आणि अशा कलाकारांना जास्त पैसा देत आहे, जे साधी एका चांगल्या ओपनिंगची आणि कमाईची ग्यारंटी देखील देत नाही. कलाकारांचा गर्व आणि लाइफस्टाइलमध्ये सर्वात जास्त पैसा वाया जात आहे. काय हे खरंच चुकीचे घडत आहे?”

दरम्यान मागच्यावर्षी सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये विवेक यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या सिनेमाचा देखील समावेश आहे, किंबहुना हा सिनेमा या यादीत सर्वात टॉपवर आहे. द काश्मीर फाइल्स या सिनेमाने तब्बल २५२.९० कोटींची बंपर कमाई केली होती. या सिनेमाच्या माध्यमातून ९० च्या दशकात काश्मीर पंडितांवर झालेल्या अत्याचारावर भाष्य केले गेले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘श्रीकृष्णाच्या गोकुळात गेल्यासारखं वाटलं’ मिलिंद गवळी यांच्या ‘त्या’ पोस्टने जिंकली नेटकऱ्यांची मने

‘घर बंदूक बिरयानी’मध्ये कलाकरांची पाहायला मिळणार वेगवेगळी शैली; त्यामुळे ही बिर्याणी होणार अधिकच चविष्ट

हे देखील वाचा