हिंदी सिनेसृष्टीमधे असे अनेक कलाकार आहेत ज्यांना घरातूनच अभिनयाचे बाळकडू मिळाले. पण असे असले तरी या क्षेत्रात स्वतःचे नाव कमावणे आणि टिकवणे त्यांना खूप अवघड गेले. बहुतेक करून जर आपण पाहिले, तर जे स्टार किड्स या क्षेत्रात येतात त्यांना त्यांच्या घरच्यांसारखे यश मिळत नाही किंवा त्यांना अभिनय एवढा खास जमत नाही. मात्र याला अनेक कलाकार अपवाद आहेत. त्यांच्यापैकी एक म्हणजे विवेक ओबेरॉय. वडील सुरेश ओबेरॉय बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते असल्याने, विवेकने देखील याच क्षेत्रात करियर करण्याचे ठरवले. मात्र विवेकचे करियर हे त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच खूप गाजले.
विवेकने राम गोपाळ वर्मा यांच्या ‘कंपनी’ सिनेमातून इंडस्ट्रीमध्ये यशस्वी पदार्पण केले. त्याला या भूमिकेसाठी उत्कृष्ट पदार्पणाचे अनेक पुरस्कार देखील मिळाले. विवेकच्या अभिनयाचे प्रेक्षकांसोबतच समीक्षकांनी देखील खूप कौतुक केले. मात्र दुर्दैवाने विवेकचे सिनेमे चाललेच नाहीत. त्याची चित्रपटांची निवड म्हणा नाहीतर नशीब, अपवाद वगळता त्याचे सिनेमे फ्लॉपच ठरत गेले.
विवेक सर्वत जास्त चर्चांमध्ये तेव्हा आला, जेव्हा त्याचे आणि ऐश्वर्याचे अफेअर चालू होते. रिपोर्टनुसार सलमानने विवेकला धमक्या दिल्या होत्या, ज्यामुळे त्या दोघांचे ब्रेकअप झाले. ऐश्वर्या विवेकच्या आयुष्यातून गेल्यानंतर विवेकच्या आयुष्यात दुसरी कोणतीच व्यक्ती आली नाही. ब्रेकअपनंतर विवेक बराच काळ इंडस्ट्रीमधून गायब होता. काही काळाने विवेकने प्रियांका अल्वासोबत अरेंज मॅरेज केले. प्रियांका ही कर्नाटकचे माजी मंत्री दिवंगत जीवराज अल्वा यांची मुलगी आहे. या दोघांची लव्हस्टोरी खूपच सुंदर आहे.
विवेकच्या आईवडिलांची अशी इच्छा होती की, विवेकने लग्न करावे आणि मागचा भूतकाळ विसरावा. विवेक काही काळ लंडनमध्ये त्याच्या आईसोबत होता. तेव्हा त्याच्या आईने त्याला सांगितले की, “अशी प्रियांका नावाची मुलगी आहे, जी सध्या फ्लोरेंसमध्ये आहे, तू जाऊन भेटून ये.” यावर त्याने त्याच्या आईला साफ नकार दिला मात्र बराच वेळ त्याला समजून अखेर तो तयार झाला. तेव्हा तो आली म्हणाला, तो आधी त्या मुलीला एक वर्ष डेट करेल. त्याला योग्य वाटले तरच तो नंतर लग्न करेल. यावर आई तयार झाली आणि विवेक प्रियांकाला भेटला. मात्र त्याला ती एवढी आवडली की भेटीनंतर काही महिन्यांनी म्हणजेच २०१० मध्ये त्यांनी लग्न केले. लग्नाच्या तीन वर्षांनी त्याला एक मुलगा झाला तर मुलानंतर दोन वर्षांनी त्याला मुलगी झाली. आज विवेक त्याच्या कुटुंबासोबत खूप खुश आणि सुखी जीवन व्यतीत करत आहे. प्रियांका एक सोशल वर्कर असून, तिने अनेक NGO साठी काम केले आहे.
विवेकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले, तर तो शेवटचा ‘पीएम नरेंद्र’ चित्रपटात मोदींच्या भूमिकेत दिसला होता. आता तो लवकरच हॉरर- थ्रिलर फिल्म ‘रोजी: द सैफ्रॉन चॅप्टर’ सिनेमात दिसणार आहे. याच सिनेमातून अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
अभिनयासोबतच विवेक एका प्रोडक्शन हाऊसचा मालक आहे. शिवाय त्याने अनेक क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. बहुतेक करून विवेक शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राशी अधिक जोडलेला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
जेव्हा विशाल दादलानीने केला होता त्याच्या वाईट सवयीचा खुलासा; एका दिवसाला पित होता ४० सिगारेट, पुढे जे झाले…
नाशकात पोलिसांकडून रेव्ह पार्टीचा पर्दाफाश! मराठी बिग बॉस फेम हिना पांचाळसह २२ जणांना अटक
पहिल्यांदाच आपल्या रेस्टॉरंट ‘सोना’मध्ये गेली प्रियांका चोप्रा; पाणीपुरीचा आस्वाद घेतानाचा फोटो व्हायरल