Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड 8500 काेटींचा खेळ! विवेकच्या यशाची कथा ऐकलीत का?

8500 काेटींचा खेळ! विवेकच्या यशाची कथा ऐकलीत का?

विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. आता तो सगळं लक्ष बिझनेसवर देतोय आणि त्यातून त्याने भरपूर पैसे कमावलेत!

अभिनेता विवेक ओबेरॉय आता चित्रपटांपासून पूर्णपणे दूर गेला आहे आणि सगळं लक्ष व्यवसायावर देतोय. अलीकडेच त्याने सांगितलं की, गेल्या वर्षभरात त्याच्या 12 कंपन्यांनी मिळून 8500 कोटी रुपये जमा केले आहेत! CNBC TV-18 सोबतच्या गप्पांमध्ये विवेक ओबेरॉयने आपल्या वडिलांविषयी सांगितलं, “माझे वडील कायम गुंतवणूक करत होते. ते जमीन खरेदी-विक्री करायचे आणि नेहमी पैसे कमवायचे. जमीनच माझं पहिलं बिझनेसचं ओळख झालं.

मी 9-10 वर्षांचा असताना ते अचानक काही ना काही सामान घेऊन यायचे. कधी परफ्यूम, कधी इलेक्ट्रॉनिक्स. मी ते सगळं बॅगेत भरायचो आणि घराघरात जाऊन विकायचो. नंतर ते माझ्याकडून खाती मागायचे, नफा ठेवायला परवानगी द्यायचे, पण खर्च माझ्याकडूनच घेतले जायचे!”

पुढे विवेक म्हणतो, “फिल्म इंडस्ट्री फार मजबूत नव्हती. मला तिथं काही लोकांसोबत राहणं आणि काम करणं आवडायचं, पण तिथं काही गोष्टी परत द्याव्या लागतात. लोकांनी टॅलेंट असलेल्या लोकांना संधी, सल्ला, आणि सपोर्ट द्यायला हवा. पण तिथं हे सगळं सिस्टीममध्येच नव्हतं.”

पुढे विवेक ओबेरॉय म्हणाला, “मागच्या वर्षीच माझ्या सगळ्या कंपन्यांनी मिळून 1 बिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 8500 कोटी रुपये जमा केले असतील. ही रक्कम मोठी आहे, पण मुद्दा पैसे किती आहेत, याचा नाही… हे पैसे कुठे वापरले जातायत, आणि त्यातून होणारी वाढ कशी सुरक्षित ठेवायची, हे जास्त महत्त्वाचं आहे. हे अगदी तसं आहे जसं सिलिकॉन व्हॅलीचं टेक्नोलॉजीचं ज्ञान आणि मारवाडी लोकांची हुशारी एकत्र यायला हवी. जसं बॉलिवूडमध्ये परदेशी चित्रपट कॉपी करताना देसी तडका देतात, तसंच बिझनेसमध्ये पण देसी स्टाइल का वापरू नये?” तसचं सांगायचं झालं, तर विवेक ओबेरॉयची एकूण संपत्ती सध्या सुमारे 1200 कोटी रुपये इतकी आहे!

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा 

हलाखीचं बालपण ते सिनेसृष्टीत अढळ स्थान; संजीव कुमार यांचा प्रवास राहिला तिशय खडतर…

हे देखील वाचा