दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री वीजे चित्रा आत्महत्या केली आहे. वीजे चित्रा ही तमिळ भाषेतील टीव्ही अभिनेत्री म्हणून अधिक प्रसिद्ध होती. तिच्या आत्महत्येने तमिळ चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
चेन्नईमधील एका हॉटेलमध्ये 28 वर्षीय चित्राचा मृतदेह आढळून आला. महत्वाचे म्हणजे काही दिवसांपूर्वीच उद्योगपती हेमंत रवी यांच्यासोबत चित्राचा साखरपुडा देखील झाला होता. त्यामुळे तिच्या आत्महत्येमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

चित्राने जरी अचानकपणे आत्महत्या केली असली, तरीही तीने हे पाऊल नैराश्यातून उचलले आल्याचे सध्या सांगण्यात येत आहे. चित्रा ही रात्री २.३० वाजता चित्रीकरण संपल्यानंतर हॉटेलमध्ये पोहोचली आणि त्यानंतर तिने गळफास घेतल्याचे हेमंत रवी यांनी सांगितले.
चित्राने ‘पांडियन स्टोर्स’ या मालिकेत केलेली भूमिका विशेष गाजली होती. मुलई ही भूमिका या मालिकेत तिने साकारली होती. या मालिकेमुळे चित्रा प्रकाशझोतात आली होती. तिच्या निधनामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.