Tuesday, January 27, 2026
Home साऊथ सिनेमा 70 कोटींच्या बजेटचा हा चित्रपट 10 टक्क्यांचाही गल्ला जमवू शकला नाही, 6 दिवसांतच सिनेमागृहातून हटवला, ठरला सुपर डिझास्टर

70 कोटींच्या बजेटचा हा चित्रपट 10 टक्क्यांचाही गल्ला जमवू शकला नाही, 6 दिवसांतच सिनेमागृहातून हटवला, ठरला सुपर डिझास्टर

सन 2025 मध्ये ‘धुरंधर’ आणि ‘सैयारा’सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, तर काही मोठ्या बजेटचे चित्रपट मात्र अक्षरशः आपटले. यामध्ये अशाही एका मेगा बजेट चित्रपटाचा समावेश आहे, ज्यावर निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला, पण हाती मात्र प्रचंड निराशा आली. आम्ही बोलत आहोत त्या चित्रपटाबद्दल, ज्याच्या निर्मितीसाठी 70 कोटी रुपये खर्च करण्यात आले, पण हा चित्रपट 3 कोटींचाही गल्ला जमवू शकला नाही. धक्कादायक बाब म्हणजे, अवघ्या 6 दिवसांतच हा चित्रपट सिनेमागृहातून हटवण्यात आला आणि निर्मात्यांना मोठा तोटा सहन करावा लागला.

2025 संपत असताना ‘वृषभ’ नावाचा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मोहनलालसारखा(Mohanlal) सुपरस्टार मुख्य भूमिकेत असूनही चित्रपटाला यश मिळवता आले नाही. 25 डिसेंबर (ख्रिसमस)च्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला हा मल्याळम भाषेतील चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला. मल्याळम सिनेसृष्टीतील अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट्सपैकी एक मानला जाणारा ‘वृषभ’ अपेक्षांवर पूर्णपणे पाणी फेरणारा ठरला.

‘L2: एम्पुरान’च्या दणदणीत यशानंतर मोहनलाल यांचा हा चित्रपट येत असल्याने निर्माते, अभिनेता तसेच प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांची निराशा झाली. पहिल्याच दिवशी ‘वृषभ’ने फक्त 60 लाखांची कमाई केली. परदेशातही चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. दुसऱ्या दिवशी कमाईत आणखी घसरण झाली आणि वीकेंडलाही चित्रपट काही खास कमाल दाखवू शकला नाही.

चित्रपटाने 6 दिवसांत केवळ 2.20 कोटी रुपये कमावले. वर्ल्डवाइड कलेक्शन पाहता, हा आकडा चित्रपटाच्या बजेटच्या तब्बल 97 टक्के कमी होता. प्रचंड तोटा लक्षात घेता, पहिल्या सोमवारीच चित्रपट सिनेमागृहातून हटवण्यात आला, म्हणजेच हा चित्रपट आठवडाभरही थिएटरमध्ये टिकू शकला नाही.

‘वृषभ’ची कथा नंदा किशोर यांनी लिहिली असून दिग्दर्शनाची धुराही त्यांनीच सांभाळली आहे. चित्रपटात मोहनलाल दुहेरी भूमिकेत झळकतात. दोन वेगवेगळ्या काळात घडणारी ही कथा — एका मध्ययुगीन राजाची आणि एका आधुनिक काळातील व्यावसायिकाची — प्रेक्षकांना सिनेमागृहापर्यंत खेचण्यात अपयशी ठरली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

Border 2 Collection Day 4: प्रजासत्ताक दिनी सनी देओलच्या ‘बॉर्डर 2’चा बॉक्स ऑफिसवर जलवा, ‘धुरंधर’-‘छावा’लाही टाकले मागे

हे देखील वाचा