पन्नास ते सत्तरचे दशक गाजवलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री वहीदा रहमान यांनी आपल्या अभिनयाने आणि अदाकारीने सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. नुकतेच त्या ‘डान्स दिवाणे 3’च्या मंचावर आल्या होत्या. त्यांच्यासोबत आशा पारेख आणि हेलन या अभिनेत्रींनीही हजेरी लावली होती. या शोमध्ये त्यांनी त्यांच्या काळातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. त्यांचा अभिनय, डान्स आणि वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. सोशल मीडियावर त्यांचा या शोमधील एक व्हिडिओ खूपच व्हायरल होताना दिसत आहे.
वहीदा रहमान यांनी सांगितले की, “लहान असताना मला भरतनाट्यम शिकायचे होते. मी ज्या गुरुकडे शिकण्यासाठी गेले, तेव्हा त्यांनी मला डान्स शिकवण्यास नकार दिला. तिथे माझी एक मैत्रीण होती तिला मी म्हणाले की, मला त्यांच्याकडूनच शिकायचे आहे. त्यावर त्यांनी उत्तर दिले की, ‘नाही मी हिला नाही शिकवू शकत.’ परंतु हे सगळं का? ‘कारण मुलगी मुसलमान आहे म्हणून.’ त्याच्याशी काय देणं घेणं आहे. मुसलमान असो ख्रिश्चन असो किंवा हिंदू असो त्याने काय फरक पडतो? ‘नाही, ती जे काही आहे – पदम, वर्णम – ती ते करू शकणार नाही.‘”
वहीदा यांनी नंतर सांगितले की, “मी खूप हट्ट केला. माझ्या मित्रांना पाठवले. आईला देखील पाठवले. तेव्हा ते गुरु म्हणाले की, अच्छा ठीक आहे तिची कुंडली घेऊन या. त्यावर आम्ही सांगितले की, आम्ही कुंडली नाही बनवत त्यावर ते म्हणाले की, हा तर खूप मोठा प्रोब्लेम आहे. तुम्ही मला तिची जन्म तारीख सांगा मी स्वतः तिची कुंडली काढतो. त्यानंतर त्यांनी माझी कुंडली काढली, तेव्हा ते म्हणाले अरे व्वा खूप चांगली गोष्ट आहे ही तर माझी खूप चांगली शिष्या आहे.”
वहीदा रहमान या यशस्वी अभिनेत्री सोबतच एक उत्कृष्ट डान्सर देखील आहेत. 1950 पासून ते 1970 पर्यंत त्यांच्या अभिनयाच्या जलवा सर्वत्र पसरला होता. त्यांनी आणि त्यांच्या बहिणींनी भरत नाट्यमचे प्रशिक्षण घेतले होते. उत्तम डान्सर असल्याने त्यांना चित्रपटात देखील खूप पटकन काम मिळत असे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-हरियाणवी गायिका रेणुका पवारच्या गाण्याने वाढवला यूट्यूबचा पारा, व्हिडिओत दिसतेय एकदम कडक
-हॉलिवूडमधील ‘द सुसाईड स्क्वॉड’ चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीझ, जॉन सीनाचा जबरदस्त अंदाज


