सध्या हृतिक रोशन त्याच्या आगामी ॲक्शन ड्रामा चित्रपट ‘वॉर 2’ मुळे सतत चर्चेत आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर पहिल्यांदाच हृतिकसोबत दिसणार आहे. या चित्रपटाबाबत नवीन माहिती समोर आली आहे, त्यानुसार ‘वॉर 2’ मध्ये कियारा आणि हृतिकचा रोमँटिक ट्रॅक असू शकतो, ज्याचे शूटिंग इटलीमध्ये होणार आहे.
दिग्दर्शक अयान मुखर्जी ‘वॉर 2’ चं प्रोडक्शन इटलीला घेऊन जाण्याचा विचार करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, १८ सप्टेंबर २०२४ पासून, टीम इटलीमध्ये हृतिक आणि कियारा अडवाणीवर प्रीतमने रचलेल्या रोमँटिक गाण्याचे शूटिंग सुरू करेल. ‘वॉर 2’च्या गाण्यांचे शूटिंग इटलीमध्ये जवळपास १५ दिवस चालणार आहे. अयानने तिथे रोमँटिक गाणे चित्रित करण्याची पूर्ण योजना आखली आहे. या गाण्यात हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वात ग्लॅमरस अवतारात दिसणार आहेत.
प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे मोठ्या स्केलवर तयार केले जात असून ते व्हेनिस, टस्कनी, लेक कोमो, नेपल्स, अमाल्फी कोस्ट आणि सोरेंटोसह विविध सुंदर ठिकाणी चित्रित केले जाणार आहे. गाण्यानंतर, क्रू ऑक्टोबरच्या सुरुवातीला भारतात परतेल.
‘वॉर 2’ हा आदित्य चोप्राच्या YRF स्पाय युनिव्हर्सचा सहावा चित्रपट आहे, याआधी एक था टायगर (२०१२), टायगर जिंदा है (२०१७), वॉर (२०१९), पठाण (२०२३) आणि टायगर 3 (२०२३) ) आले. या चित्रपटाद्वारे ज्युनियर NTRचे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण देखील होईल. ऋतिक आणि ज्युनियर एनटीआरचे चाहते ‘वॉर 2’ बद्दल खूप उत्सुक आहेत.
कामाबद्दल बोलायचे झाले तर ‘वॉर 2’ व्यतिरिक्त कियारा राम चरणसोबत ‘गेम चेंजर’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय कियारा दिग्दर्शक फरहान अख्तरच्या ‘डॉन 3’ या चित्रपटातही दिसणार आहे. ‘वॉर 2’ व्यतिरिक्त, ज्युनियर एनटीआर देवरा चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत जान्हवी कपूर पहिल्यांदाच दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
नितेश तिवारीच्या ‘रामायण’मध्ये रणबीर कपूर साकारणार दुहेरी भूमिका; या अवतारात देखील दिसणार अभिनेता