स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) हा मराठी चित्रपट जगतातील यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने आणि हॅंण्डसम लूकने त्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलेला स्वप्निल जोशी सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असतो. ज्यावरुन तो आपल्या चाहत्यांशी अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. सध्या स्वप्निलची अशीच एक पोस्ट जोरदार चर्चेत आली आहे ज्यामध्ये त्याने त्याच्या पत्नीचे तोंडभरुन कौतुक केले आहे. काय आहे ती पोस्ट चला जाणून घेऊ.
आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेला स्वप्निल जोशी सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असतो. सध्या चला हवा येऊ द्या मालिकेत दिसणारा स्वप्निल जोशी लवकरच सत्यवान सावित्री या मालिकेत झळकणार आहे. याच मालिकेनिमित्त स्वप्निलने त्याची पत्नी लीनाचे कौतुक केले आहे. या मालिकेच्या प्रोमोमध्ये स्वप्निल याबद्दल बोलताना दिसत आहे. या नव्या मालिकेची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
यावेळी स्वप्निल म्हणतो की, “माझ्या लग्ना्आधी असे काही प्रसंग घडले होते ज्यामुळेआई बाबा चिंतेत होते. त्यामुळेच लग्न करावे की नाही याबद्दल मी खूप गोंधळलेलो होतो. नवीन मुलगी माझ्या घराला, आई बाबांना सांभाळून घेईल की नाही याबाबत मी खूपच चिंतेत होतो. पण लीना लग्न करुन घरात आली आणि आई बाबांची लाडकी झाली. लीनाने माझ्या घराला उभ केलं. त्यामुळे माझ्या घरातील सावित्री तिच आहे आणि याबद्दल मी तिचा सदैव ऋणी आहे,” दरम्यान अभिनेत स्वप्निल जोशी आणि लीना यांचा विवाह २०११ मध्ये पार पडला.स्वप्निलची पत्नी एक डेंटिस्ट असून त्यांना मायरा आणि राघव अशी दोन मुले आहेत.