असं म्हणतात, या जगात एकसारख्या दिसणारी सात व्यक्ती आहेत. मात्र या वाक्यात किती सत्यता आहे, याबद्दल नक्कीच सर्वांना शंका असेल, कारण अशा सात व्यक्ती पहिल्याच कोणीच दावा केला नाही. मात्र कदाचित या वाक्यात थोडा बदल केला तर हे वाक्य काही अंशी बॉलिवूडच्या कलाकरांना लागू होईल. बदल असा की, या कलाकारांच्या चेहऱ्याशी साधर्म्य असणाऱ्या सात नाही मात्र एक किंवा दोन व्यक्ती नक्कीच सापडतात. अनेकदा या सारख्या असणाऱ्या लोकांचे फोटो कलाकारांच्या फोटोसोबत कोलाज करून व्हायरल होताना आपण पाहिले आहेत.
मात्र सध्या सोशल मीडियावर एका मुलीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुलीचा चेहरा बॉलिवूडची बबली गर्ल असणाऱ्या आलिया भट्टच्या चेहऱ्याशी मिळता जुळता असल्याने तिला आलिया भट्टची डुप्लिकेट म्हटले जात आहे. कारण ती अगदी आलिया सारखीच दिसते. हा व्हिडिओ व्हायरल होणारी मुलगी इंस्टाग्रामवर ब्लॉगर असून तिला ३३ हजारांपेक्षा अधिक फॉलोवर्स असून ती नेहमी तिचे व्हिडिओ पोस्ट करत असते.
या मुलीचे इंस्टाग्राम अकाउंट celesti.bairagey या नावाने असून, तिचे आता अनेक फोटो आणि व्हिडिओ आलियाची डुप्लिकेट म्हणून व्हायरल होत आहेत. या मुलीचे फोटो तुम्ही पाहिले तर काही सेकंड तुम्ही सुद्धा गोंधळून जाल. आलियाच्या गालावर पडणारी खळी देखील या मुलीच्या चेहऱ्यवर पडते. त्यामुळे सध्या आलिया भट्टची ही डुप्लिकेट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.
आलिया भट्टच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर संजय लीला भंसाली यांच्या ‘गंगूबाई काठियावाड़ी’ सिनेमात दिसणार आहे. शिवाय ती एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ सिनेमात दिसणार असून, या सिनेमाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ती अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ मध्ये देखील काम करतांना दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कोणी उडवला थरकाप, तर कोणी पाडली भुरळ; पाहा ‘या’ अभिनेत्रींचा लक्षवेधी ‘हॅलोविन लूक’