सिनेजगताचा प्रवास आपल्याला वाटतो तेवढा सोपा अजिबातच नाहीये. अनेक कलाकार असे आहेत, ज्यांनी बॉलिवूडमध्ये येण्याआधी अनेकदा ऑडिशन दिले आहेत, पण त्यांना बऱ्याचदा अपयशाचा सामना करावा लागला आहे. बॉलिवूडमध्ये प्रवेश मिळवण्याकरता ते सतत प्रयत्न करत राहिले, आणि आपले ध्येय पूर्ण केले. काही कलाकार असे पण असतात की, ऑडिशन दिलेल्या प्रत्येक चित्रपटात त्यांना काम मिळतेच, असे अजिबात नाही. अशीच एक अभिनेत्री म्हणजे अनुष्का शर्मा. शनिवारी (१ मे) अनुष्का आपला ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म सन १९८८ साली अयोध्यामध्ये झाला होता. आज अनुष्काच्या वाढदिवसानिमित्त आपण तिच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओबद्दल जाणून घेणार आहोत.
अनुष्का शर्मा २००८ साली ‘रब ने बना दी जोडी’ या सिनेमातून अनुष्काने शाहरुख खानबरोबर मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये जोरदार पदार्पण केले होते. मात्र, अनुष्काने आमिर खानच्या ‘३ इडियट्स’ या चित्रपटासाठीही ऑडिशन दिले होते. अनुष्काचा हा जुना व्हिडिओ आता सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/p/CONOWs1AIEM/?utm_source=ig_web_copy_link
हा व्हिडिओ अनुष्काच्या इंस्टाग्रामवर फॅन पेजने शेअर केला आहे. अनुष्का या व्हिडिओमध्ये मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातील एकल संवाद बोलताना दिसत आहेत. संवाद बोलताना अनुष्का भावुक झाली, आणि तिच्या डोळ्यात पाणी येऊ लागले.
आमिर खानचा ‘३ इडियट्स’ हा चित्रपट २००९ मध्ये रिलीझ झाला होता. तो हिंदी सिनेमातील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. आमिर खानसमवेत या चित्रपटात शरमन जोशी आणि आर माधवन यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या, तर अभिनेत्री म्हणून करीना कपूर या चित्रपटात होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिराणी यांनी केले होते.
अनुष्काला ‘३ इडियट्स’ चित्रपट तर हाती लागला नाही, पण ‘पीके’ चित्रपटामध्ये तिला आमिर खानसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. पीकेमध्ये, अनुष्का एका पत्रकाराच्या भूमिकेत होती.
अनुष्का बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनयाबरोबरच अनुष्काने फिल्ममेकिंग क्षेत्रातही आपली ओळख मजबूत केली आहे. ती दर्जेदार चित्रपट बनवत आहेत. सध्या ती निर्माती म्हणून, अधिक सक्रिय होत आहे. तिचा ‘बुलबुल’ हा चित्रपट गेल्या वर्षी नेटफ्लिक्सवर रिलीझ झाला होता. दुसरीकडे तिची ‘पाताल लोक’ ही वेब सीरिज ऍमेझॉन प्राईमवर आली होती. आता अनुष्काची आणखी एक वेब सीरिज नेटफ्लिक्सवर येणार आहे. या दिवसात सगळीकडेच आयपीएलची हवा सुरु आहे, त्यातच अनुष्का शर्मा पती विराट कोहलीला पाठिंबा देण्याकरता मैदानात सतत हजार असते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-रेमो डिसूजाने पत्नी लिजेलसोबत केला मजेशीर व्हिडिओ शूट, पाहून तुम्हीही खदखदून हसाल
-खरंच! आयुष्यातील पहिली किस म्हणत रणबीर कपूरने घेतले होते माधुरी दीक्षितचे नाव, सांगितले कधी आणि कसे