Tuesday, July 9, 2024

भारतीय गाण्याची जादू देशाबाहेरही! इराणी महिला बनली ‘बसंती’, तर ‘वीरू’ अन् ‘गब्बर’ही दिसले व्हिडिओत

हिंदी चित्रपटसृष्टीचा आयकॉनिक चित्रपट म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘शोले’ चित्रपटाची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये आहे. हा चित्रपट रिलीझ झाल्याच्या बऱ्याच वर्षानंतरही लोक त्याची गाणी, डायलॉग कॉपी करतात. दरम्यान, यासंदर्भात इराणमधील महिलेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

त्यात एक इराणी महिला शोलेच्या ‘जब तक है जान’ या हिट गाण्यावर नाचत आहे. दुसरीकडे, डान्स फ्लोरजवळ एक व्यक्तीचे शोलेचा वीरू म्हणजेच धर्मेंद्र सारखे हात दोरीने बांधलेले आहेत.

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, चित्रपटातील एका सीनप्रमाणेच हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला चांगली पसंती मिळत आहे. व्हिडिओमध्ये ती स्त्री एका उत्तम स्टाईलने नाचताना दिसत आहे. वीरू दोरीने बांधलेला आहे आणि गब्बर बाजूला उभा राहून डान्सचा आनंद घेत आहे.

या व्हिडिओची सुरुवात हेमा मालिनीच्या बसंतीचे पात्र साकारणाऱ्या महिलेच्या एन्ट्रीने होते. ती नाचत असताना वीरूची भूमिका साकारणारा एक व्यक्ती, दारात हात बांधून उभा आहे. त्याचवेळी दोन लोक गब्बर आणि सांभाचे पात्र साकारत आहेत. ते बाजूला उभे राहून त्या महिलेचा डान्स पाहत आहेत. त्यांच्या हातात बंदूकही आहे.

‘शोले’ हा 1975 मध्ये रिलीज झालेला एक हिंदी ऍक्शन चित्रपट आहे. चित्रपटाची कथा जय आणि वीरू या दोन गुन्हेगारांवर आधारित आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जया भादुरी आणि हेमा मालिनी मुख्य भूमिकेत आहेत. शोले हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जातो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दिलजीतने शेअर केला मुलासोबतचा मजेशीर व्हिडिओ, सेलेब्सनी विचारले ‘आई कुठे आहे?’

-मराठमोळी जोडी रितेश अन् जेनेलियाही रंगले होळीच्या रंगात, रोमँटिक व्हिडिओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!!

-इरफान खानच्या आठवणीत मुलगा बाबिल झाला भावुक; वडिलांचे कपडे परिधान करत दिला आठवणींना उजाळा

हे देखील वाचा