Monday, July 1, 2024

जेव्हा ऐश्वर्याच्या चाहत्याने तिला लग्नासाठी केले होते प्रपोज; ‘अशी’ दिली होती पती अभिषेकने प्रतिक्रिया

बॉलिवूडमध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय या जोडप्याला भरपूर प्रेम मिळते. अभिनेत्री ऐश्वर्या राय अजूनही तिच्या सौंदर्यामुळे जगभरातील कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर राज्य करते. आता ऐश्वर्या आणि अभिषेकचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ खूप जुना अर्थातच या दोघांच्या लग्नानंतरचा आहे. व्हिडिओमध्ये असे दिसून येत आहे की, एका चाहत्याने ऐश्वर्याला चक्क लग्नासाठी प्रपोज केले होते.

वास्तविक हा व्हिडिओ कान फिल्म फेस्टिव्हलचा आहे, जेव्हा ऐश्वर्या राय तिचा पती अभिषेक बच्चनसोबत रेड कार्पेटवर दिसली होती. फोटोसाठी पोझ देत असताना अभिषेकचे लक्ष एका चाहत्याकडे गेले. त्या चाहत्याच्या हातात एक प्लेकार्ड होते, ज्यावर ऐश्वर्यासाठी लिहिलेले होते ‘मॅरी मी.’ अभिषेकची नजर या चाहत्याकडे गेली, तेव्हा ऐश्वर्या फक्त हसली. पण अभिषेक त्या चाहत्याकडे इशारा करत म्हणाला, “नाही भाऊ, तिने माझ्याशी लग्न केले आहे, सॉरी.”

सन २००७ मध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे जोडपे विवाहबंधनात अडकले होते. ऐश्वर्या आणि अभिषेकची पहिली भेट १९९९ मध्ये, ‘ढ़ाई अक्षर प्रेम के’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. यानंतर दोघांनी ‘धूम २’, ‘उमराव जान’ आणि ‘गुरू’ या चित्रपटात एकत्र काम केले.

अभिषेक बच्चनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर अखेरच्या वेळेस त्याचा ‘द बिग बुल’ हा चित्रपट रिलीझ झाला होता, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता त्याचा ‘बॉब बिश्वास’ हा चित्रपट रिलीझ होणार आहे.

ऐश्वर्याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती अखेरच्या वेळेस अनिल कपूर आणि राज कुमार राव यांच्यासोबत ‘फन्ने खान’ मध्ये दिसली होती. आता ती मणिरत्नमच्या ‘पोन्नीयन सेल्वान’ या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पांढऱ्या वाघाच्या बछड्यासोबत उर्वशीने केले ‘असे’ काही, पाहून तुम्हीही म्हणाल ‘जिगरबाज’

-एक- दोन नव्हे, तर ऋतिक रोशन एका वेळेला खातो चक्क ८ समोसे! स्वतः च केला होता खुलासा

-आलिया भट्टच्या लाईव्ह सेशनमध्ये दिसला रणबीर कपूरअन् तो पण विना शर्ट, एकदा पाहाच हा व्हिडिओ

हे देखील वाचा