‘आश्रम’ या वेब सीरिजमधून प्रत्येकाच्याच हृदयात आपले घर करणारी अभिनेत्री आदिती पोहणकर खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे. बुधवारी (१९ मे) जेव्हा तिला मुंबईत स्पॉट केले गेले होते, तेव्हा पुन्हा एकदा हे सिद्ध झाले की, तिने स्वत: ला फोटोग्राफर्ससमोर उत्कृष्ट प्रकारे सादर केले आहे.
तौत्के वादळानंतर घराबाहेर पडलेली आदिती , आपल्या खुल्या केसात कमालीची दिसत होती. तिच्या ड्रेसला काळ्या रंगाचे शूज शोभून दिसत होते. आदिती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायमच आपल्या चाहत्यांशी संपर्कात असते.
‘आश्रम’ या वेबसीरिजमध्ये आदितीने पम्पीची भूमिका केली होती. या अगोदर तिने ‘शी’ नावाच्या वेबसीरिजमध्ये एक आकर्षक पात्र केले आहे. आदिती पोहणकर म्हणते, ‘मी यशस्वी काम करण्यासाठी आतुर असते. जेव्हा मला चांगली स्क्रिप्ट मिळेल, तेव्हा मला त्यावर काम करायचे आहे.’
मराठी आणि तमिळ सिनेमांमध्ये अभिनय करणार्या आदिती पोहणकरचे २०२०वर्ष खूप चांगले होते. सीरिजमुळे तिला संपूर्ण चांगली ओळख मिळाली आहे. ती म्हणते, “मला कशासाठीही काही बोलण्याची गरज नाही. ‘शी’ वेब सीरिज ब्लॉकबस्टर असल्याचे सिद्ध झाले आहे, तर ‘आश्रम’ या वेब सीरिजलाही जबरदस्त यश मिळालं आहे.”
आदिती दिती कुस्तीगीर ‘संग्राम सिंग’ यांच्याकडून कुस्ती शिकली, आणि ‘आश्रम’ वेब सीरीजमध्ये कुस्तीपटू म्हणून भूमिका केली. रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ चित्रपटामुळे आदिती चांगलीच लोकप्रिय झाली आहे.
https://www.instagram.com/p/CHsa5jqD7MV/?utm_source=ig_web_copy_link
आदितीकडे पाहिलं तर कोणीही असे म्हणू शकत नाही की, ती भूमिकांमध्ये टाईपकास्ट झाली आहे. आदितीने २०१० मध्ये आपल्या करियरची सुरुवात केली होती.
एका मुलाखतीत आदितीने खुलासा केला की, तिने आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते. थिएटरपासून मराठी चित्रपटात, आणि आता वेब सीरिजमध्ये उतरलेल्या आदितीला बऱ्याच काळापासून पडद्यावर पैलवानाची भूमिका साकारायची होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-