Friday, May 9, 2025
Home वेबसिरीज थरार, एक्शन आणि रहस्यमय कथांचे फॅन असाल तर ‘या’ धमाकेदार वेबसिरीज एकदा पाहाच

थरार, एक्शन आणि रहस्यमय कथांचे फॅन असाल तर ‘या’ धमाकेदार वेबसिरीज एकदा पाहाच

सध्या लोक टीव्ही आणि सिनेमापेक्षा ओटीटी प्लॅटफॉर्मला जास्त महत्त्व देत आहेत. कारण ओटीटी हे झपाट्याने उदयास येणारे व्यासपीठ आहे जिथे चित्रपट, वेब सिरीज, गाणी आणि अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम यावर उपलब्ध आहेत. त्यामुळेच प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉर्मकडे आकर्षित होताना दिसत आहेत. यामधील धमाकेदार वेबसिरीज पाहायला मिळतात. रोमान्स, थरार, क्राईम असा भरपुर मसाला या सिरीजमध्ये पाहायला मिळतो. तुम्हीही जर अशा कार्यक्रमांचे चाहते असाल तर या खाली दिलेल्या वेबसिरीज पाहायला अजिबात विसरू नका. ज्यामध्ये तुम्हाला जोरदार मनोरंजनाचा तडका पाहायला मिळणार आहे.

फॅमिली मॅन –
ही एक एक्शन थ्रिलर वेब सिरीज आहे, ज्याची कथा एका मध्यमवर्गीय माणसावर आधारित आहे, जो एक रॉ एजेंट म्हणून काम करतो. एक मध्यमवर्गीय माणूस आपल्या कुटुंबासह एजन्सीला कसा सोबत घेऊन जातो हे वेब सिरीजमध्ये दाखवण्यात आले आहे.आत्तापर्यंत या वेबसिरीजचे दोन सिझन सुपरहीट ठरले आहेत. ज्यामध्ये मनोज वायपेयी यांच्या अभिनयाने सर्वांनाच थक्क केले आहे.

मिर्झापूर – सत्ता, संघर्ष, आणि यावरुनच सुरू झालेले जिवघेणे राजकारण यावर ही सिरीज आधारित आहे. मिर्झापूर ही उत्तर प्रदेशातील पूर्वांचल जिल्ह्यांतील वाढत्या गुन्हेगारीवर आधारित असलेली एक जबरदस्त सिरीज आहे. या मालिकेत मिर्झापूरचे गँगस्टर कालिन भैया आणि मुन्ना त्रिपाठी आपले प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात असे दाखवण्यात आले आहे. या मालिकेत तुम्हाला ड्रामा, एक्शन, सस्पेन्स आणि रोमान्स हे सगळंच पाहायला मिळेल.

पाताल लोक – पाताळ लोक ही एक वेब सिरीज आहे ज्यामध्ये एक हाय प्रोफाईल केस सोडवण्याचा प्रयत्न करताना एक पोलीस अधिकारी अंडरवर्ल्डच्या गर्त्यात जातो. या वेब सिरीजचा एकच भाग आहे. यात जयदीप अहलावत आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

मेड इन हेवन – ही वेब सिरीज अशी आहे की एक वेडिंग कंपनी आहे, ज्याचे नाव मेड इन हेवन आहे. हे लोक सर्व प्रकारचे विवाह करतात. यामध्ये मुलगा समलिंगी असून मुलगी एका व्यावसायिकाची पत्नी आहे. दोघेही त्यांच्या व्यावसायिक तसेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित आहेत. जबरदस्त फॅमिली ड्रामा या सिरीजमध्ये पाहायला मिळत आहे.

लाखोंमे एक – ही सुद्धा एकवेळ नक्की पाहावी अशीच वेबसिरीज आहे. आतापर्यंत लाखोंमे एक चे दोन भाग आले आहेत. पहिल्या भागात प्रवेशासाठी कोचिंग अकादमीत प्रवेश घेणाऱ्या मुलाची कथा दाखवण्यात आली आहे. त्याच वेळी, त्याचा सीझन 2 डॉक्टरांच्या जीवनावर आधारित आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा