मसाबा गुप्ताची (Masaba Gupta) वेब सीरिज ‘मसाबा मसाबा २’चा प्रोमो समोर आला आहे. चाहते दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते. ज्यांनी शोचा पहिला सीझन पाहिला आहे, त्यांना प्रश्न पडला होता की, मसाबाच्या आयुष्यात पुढे काय होणार? सीरिजमध्ये अनेक खास गोष्टी समोर आल्या होत्या. फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता ही एक चांगली अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांना पाहायला मिळाली. या सीरिजमध्ये मसाबा आणि तिची आई नीना गुप्ता (Neena Gupta) यांची उत्तम बाँडिंग पाहायला मिळाली. जे पाहून प्रेक्षकांना खूप आनंद झाला. पहिल्या सीझनमध्ये, मसाबा तिच्या कामासोबत नेव्हिगेट करते. ती तिच्या लव्ह लाईफमध्ये संतुलन राखते. पहिला सीझन एका महत्त्वपूर्ण वळणावर संपला. आता मसाबाच्या आयुष्यात पुढे काय घडते, हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
‘मसाबा मसाबा २’ ची रिलीझ डेट जाहीर करण्यात आली आहे. निर्मात्यांनी याचा प्रोमो व्हिडिओही रिलीझ केला आहे. प्रोमोमध्ये आपण पाहू शकतो की, मसाबा गर्भधारणा चाचणी घेत करत असते आणि तिची आई नीना गुप्ता व तिची सर्वात चांगली मैत्रीण रयताशा राठोड बाहेर थांबते. (web series masaba masaba 2 streaming date annouce)
इथे पाहा सिरीजचा प्रोमो व्हिडिओ
‘मसाबा मसाबा २’च्या रिलीझच्या तारखेची घोषणा करणारा प्रोमो शेअर करत, फॅशन डिझायनर आणि अभिनेत्रीने लिहिले, “आळशी पावसाळ्याच्या दिवशी अंथरुणातून उठण्यासाठी तुम्हाला प्रेरणा देणारे काहीतरी शोधत आहात? अच्छा. माझ्याकडे काही बातम्या आहेत, ज्या ‘मसाबा मसाबा सीझन २’ २९ जुलै रोजी फक्त नेटफ्लिक्सवर तुमच्यासाठी येत आहेत.”
सोफी चौधरी आणि कुब्रा सैतने दिल्या शुभेच्छा!
सोफी चौधरी आणि कुब्रा सैत यांनी मसाबा गुप्ताच्या या प्रोमो व्हिडिओच्या पोस्टवर ‘Yeyyy’ कमेंट केली. मसाबाच्या इंडस्ट्रीशी संबंधित अनेक मित्रांनी लव्ह आणि फायर इमोजीसह कमेंट केल्या. तसेच हा प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा