Wednesday, October 15, 2025
Home बॉलीवूड डिज्नी प्लस हॉटस्टार अन् नेटफ्लिक्सवर लागणार मनोरंजनाचा तडका, जाणून घ्या कधी काय होणार रिलीझ

डिज्नी प्लस हॉटस्टार अन् नेटफ्लिक्सवर लागणार मनोरंजनाचा तडका, जाणून घ्या कधी काय होणार रिलीझ

नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे आणि पुन्हा एकदा ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. या महिन्यात एका मागोमाग एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन होणार आहे. डिज्नी प्लस हॉटस्टार आणि नेटफ्लिक्सचा बॉक्स या महिन्यात ऍक्शन, थ्रिलर आणि सस्पेन्स कथांनी भरलेला असणार आहे. या महिन्यात, प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी एकापेक्षा एक मनोरंजक चित्रपट आणि वेबसिरीज धमाकेदार होणार आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत की, नोव्हेंबर महिन्यात तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर काय पाहता येईल.

या आठवड्याची सुरुवात नेटफ्लिक्सवर लाँग डिस्टन्स लव्ह स्टोरीसह होईल. ५ नोव्हेंबर रोजी अभिनेत्री सान्या मल्होत्रा ​​आणि अभिमन्यू दासानी यांचा चित्रपट ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’ प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या टीझरने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले ​​आहेत.

यानंतर ऍक्शन आणि थ्रिलरने परिपूर्ण असलेला ‘रेड नोटिस’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट १२ नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता ड्वेन जॉन्सन, गॅल गॅडॉट आणि रायन रेनॉल्ड्स दिसणार आहेत. नेटफ्लिक्सचा हा आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट असल्याचे बोलले जात आहे.

केके मेननची गुप्तचर सीरिज स्पेशल ‘ऑप्स १.५’ देखील १२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. ही एक ऍक्शन थ्रिलर ड्रामा सीरिज आहे, ज्यामध्ये केके मेनन हिम्मत सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेचे दिग्दर्शन नीरज पांडे यांनी केले आहे.

अभिनेता कार्तिक आर्यन आणि मृणाल ठाकूर यांचा ‘धमाका’ हा चित्रपटही १९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. या चित्रपटाच्या ट्रेलरने आधीच धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट ‘द टेरर लाइव्ह’ या कोरियन चित्रपटाचा रिमेक आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रोमँटिक अंदाजात पोझ देत होते अक्षय अन् कॅटरिना, कपिल शर्मा बनला ‘कबाब में हड्डी’

-टेलिव्हिजनवरील ‘संस्कारी सून’ दिसली बोल्ड अवतारात, रश्मीचे बिकिनी फोटो पाहून कलाकारही म्हणतायत, ‘ओहो उफ्फ’

-शाहिदने बेडरूममधील फोटो केला शेअर, पाहून पत्नी मीरा म्हणाली, ‘तू स्वत:ला संकटात टाकत आहेस, तो व्हिडिओ…’

हे देखील वाचा