साऊथ ते बॉलिवूड असा सिनेप्रवास करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये काजल अगरवाल हिच्या नावाचाही समावेश होतो.

काजल सोशल मीडियावर तुफान सक्रिय असते. तिने नुकतेच लाल रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये काजल वेगवेगळ्या पोझ देत असून खूपच हॉट दिसत आहे.

काजलने साडी परिधान केली असली, तरीही तिने कोणताही दागिना घातला नाहीये.

काजलच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचं झालं, तर तिने 2020मध्ये गौतम किचलू या व्यावसायिकासोबत संसार थाटला होता.

लग्नानंतरही काजलची सुंदरता तसूभरही कमी झाली नाहीये. काजल 'इंडियन 2' या आगामी साऊथ सिनेमात दिसणार आहे.