छोटा पडदा ते रुपेरी पडदा असा प्रवास करणाऱ्या मौनी रॉयने नवीन फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री मौनी रॉय या फोटोंमध्ये पांढऱ्या रंगाच्या पारंपारिक ड्रेसमध्ये दिसत आहे.

या फोटोंमध्ये तिने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. तिच्या या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत.

मौनीबद्दल बोलायचं झालं, तर तिला छोट्या पडद्यावरील 'नागिन' आणि 'देवों के देव महादेव' या मालिकांमधून प्रसिद्धी मिळाली.

मौनी यावर्षीच्या सुरुवातीला म्हणजेच २७ जानेवारी, २०२२ रोजी सुरज नांबियारसोबत लग्नबंधनात अडकली.

ती दरदिवशी नवनवीन फोटो शेअर करत असते. तिला इंस्टाग्रामवर २ कोटींहून अधिक चाहते फॉलो करतात.