अभिनेत्री पूजा सावंत हिने नुकतेच इंस्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये पूजा पिवळ्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये दिसत आहे.

सध्या सर्वत्र नवरात्री साजरी केली जातेय. अशात चौथ्या दिवशी पिवळा रंग असतो. त्यामुळे ती या अंदाजात दिसतेय.

पूजा सावंत हिच्या या फोटोंनी चाहत्यांनाही भुरळ घातली आहे.

पूजा शेवटची 'दगडी चाळ 2' या सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिच्यासोबत अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत होता.