'आई कुठे काय करते' या मालिकेतून अभिनेत्री रूपाली भोसले घराघरात पोहोचली आहे.

सध्या रुपालीचे काही फोटो सोशल मीडियावर चांगले चर्चेत आलेले आहेत.

या फोटोंमध्ये रूपालीने जांभळ्या रंगाची सुंदर नऊवारी साडी परिधान केलेली आहे.

या साडीच्या पदरावर त्याचप्रमाणे ब्लाउजवर मोराची चित्र दिसत आहेत.

तिने नाकात नथ, हातात बांगड्या, केसात गजरा असा मराठमोळा साज शृंगार केलेला आहे.

रूपालीचे हे फोटो तिच्या चाहत्यांना देखील मोठ्या प्रमाणात आवडलेले आहेत.