बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या काही दिवसांपासून तिच्या दमदार अभिनयामुळे चर्चेत आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘गंगूबाई काठियावाडी‘ मधील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले होते.

अशात काल म्हणजेच (15 मार्च)ला आलिया भट्टचा वाढदिवस हाेता.

त्यानिमित्त संपुर्ण चित्रपट जगतातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.

त्याचबरोबर तिने वाढदिवस सेलिब्रेशनचे काही फाेटाे शेअर केले आहे, ज्यात आलिया प्रचंड सुंदर दिसत आहे.