मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर ही अभिनयासोबत तिच्या डान्समुळे देखील सर्वत्र चर्चेत आहे.

तिच्या मनमोहक नृत्याविष्काराने ती नेहमीच सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असते.

‘नटरंग’ या चित्रपटातील तिच्या ‘वाजले की बारा’ या लावणीने, तर आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले होते.

सोशल मीडियावर देखील अनेकवेळा ती तिचे डान्स व्हिडिओ शेअर करत असते.

अशातच तिने काही साडीमधले फाेटाे शेअर केले आहे, ज्यात ती प्रचंड सुंदर दिसत आहे.