अभिनेत्री अनन्या पांडे हिने नवीन फोटो शेअर केले आहेत.

अनन्या या फोटोंमध्ये पांढऱ्या रंगाचा पट्ट्यापट्ट्याचा टी-शर्ट आणि जीन्समध्ये दिसत आहे. तसेच, तिने जॅकेटही घातले आहे.

या फोटोंमध्ये ती तिचे ऍब्जही फ्लॉन्ट करताना दिसत आहे. यातील दोन फोटोंमध्ये तिने तिचे जॅकेट काढले आहे.

अनन्या ही प्रसिद्ध अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी आहे. तीदेखील तिच्या वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत सिनेमे गाजवत आहे.

अनन्या सध्या तिच्या 'लायगर' या आगामी सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आहे.

'लायगर' हा पॅन इंडिया सिनेमा असून, या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता विजय देवरकोंडा हा मुख्य भूमिकेत आहे.