'वेड' हा रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांचा सिनेमा डिसेंबर 2022 ला रिलीज झालेला. पण हा सिनेमा 2023 जानेवारीपर्यंत थिएटरमध्ये झळकत होता. वेडने बॉक्स ऑफीसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे.

परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी' सिनेमा जानेवारी 2023 मध्ये रिलीज झालेला. या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर अनपेक्षितरित्या चांगलं यश मिळवलं.

केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर सिनेमा या वर्षातला बहुचर्चित सिनेमा होता. शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारीत या सिनेमाची खुप चर्चा झाली.

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित सुभेदार सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमात अजय पुरकर यांनी तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारली होती. या सिनेमाला बॉक्स ऑफीसवर चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

2023 मधला सर्वात यशस्वी सिनेमा म्हणजे केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा. बाईपण भारी देवा हा मराठी सिनेसृष्टीतील आजवरचा जास्त कमाई करणारा ठरला आहे.