अभिनेते देव आनंद यांची आज १०१ वी जयंती आहे. बघुयात त्यांच्या जीवनातील काही मनोरंजक आठवणीt

चित्रपटांमध्ये प्रवास सुरू करण्यापूर्वी, देव आनंद यांनी लिपिक म्हणून काम केले जेथे त्यांचा पगार ₹ 85 होता.

देव आनंद ज्यावेळी चार्ली चाप्लिन यांना भेटले त्यावेळी ते आनंदाने जोरात ओरडले ज्यामुळे खुद्द चार्ली चाप्लिन यांना सुद्धा हसायला आले

एका महिलेने देव आनंद यांना काळ्या कपड्यांत पाहून कथितरित्या इमारतीवरून उडी मारत आपले जीवन संपवले होते.

६ दशकांहून अधिक काळ चाललेल्या त्यांच्या कारकिर्दीत, त्यांनी ११० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आणि त्यांच्या निर्मिती कंपनी नवकेतन फिल्म्सद्वारे त्यापैकी अनेकांची निर्मिती आणि दिग्दर्शन सुद्धा केले.

गाईड, ज्वेल थीफ, हरे रामा हरे कृष्णा, तेरे घर के सामने, आणि जॉनी मेरा नाम हे त्यांचे काही सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट आहेत.