बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडे सध्या बॉलिवूडमधील एक मोठं नाव आहे.

अनन्याने जेमतेम 6 सिनेमात काम केलंय, पण यातून तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.

अनन्या एका सिनेमासाठी 3 कोटींहून अधिक रुपये घेते. ती सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते.

तिला इंस्टाग्रामवर  24.5 मिलियन चाहते फॉलो करतात. तिने नुकतेच साडीतील पारंपारिक फोटो शेअर केले आहेत.

या फोटोतही अभिनेत्री हॉट दिसत आहे. तिने आपला लूक पूर्ण करण्यासाठी गळ्यात दागिणा आणि कपाळावर टिकली लावली आहे.

अभिनेत्रीविषयी बोलायचं झालं, तर ती आगामी 'ड्रीम गर्ल 2' या सिनेमात दिसणार आहे.