बॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक मुदस्सर खानने गर्लफ्रेंड रिया किशनचंदानी हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे.

बॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक मुदस्सर खानने काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत ही आनंदाची बातमी दिली.

मुदस्सरने लग्नाचे फोटो शेअर करत लिहिलं, “तू या जगातली खूप सुंदर व्यक्ती आहे. माझ्या दोन्ही कुटुंबाचे आभार मानतो. त्यांच्या आशीर्वादमुळे आपण एकत्र आलो आहे.”

मुदस्सरचे लग्नाचे फोटो पाहून सध्या बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींसह त्याचे चाहते शुभेच्छा देताना दिसत आहेत.

मुदस्सर-रियाच्या या लग्नसोहळ्याला सलमान खानने हजेरी लावली होती.