अभिनेत्री दिव्या खोसला कुमार ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चांगलीच चर्चेत असते.
सध्या तिचे सुंदर फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.
या फोटोत ती कोणत्यातरी बोटीवर असल्याचे दिसतेय. यातील तिचा खूपच बोल्ड अंदाज चाहत्यांना भुरळ घालतोय.
दिव्या ही टी-सीरिजचे मालक, चित्रपट निर्माता आणि व्यावसायिक भूषण कुमार यांची पत्नी आहे.
दिव्याने अनेक सिनेमात काम केले आहे. त्यात 'सत्यमेव जयते 2', 'अब तुम्हारे हवाले वतन साथियों' या सिनेमांचा समावेश आहे.