जिनिलीया आणि रितेश देशमुख यांच्याकडे बॉलीवूडची आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं.

एकमेकांना अनेक वर्ष डेट केल्यावर रितेश-जिनिलीयाने 2012मध्ये थाटामाटात लग्न केलं.

या जोडप्याला रियान आणि राहील अशी दोन मुलं आहेत.

जिनिलीयाने 25 नोव्हेंबर 2014 रोजी रियानला जन्म दिला.

“माझ्या लेकामुळे मला एक नवीन आयुष्य मिळालं. मला मातृत्व देणाऱ्या माझ्या गोड मुलाला…माझ्या प्रिय रियानला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तू माझं प्रेम, माझं बाळ, माझा मित्र आणि आयुष्यभर माझा लाडका लेक असशील” अशी पोस्ट जिनिलीया देशमुखने शेअर केली आहे.