‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत अभिनेत्री दीपाली पानसरे दिसणार आहे.

यापूर्वी ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत दीपाली संजना या खलनायिकेच्या भूमिकेत झळकली होती.

आता पुन्हा एकदा अभिनेत्री खलनायिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

दीपालीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

या फोटोमध्ये दीपालीने लाल भरजरी लेहेंगा घातला आहे.