अभिनेत्री रितिका श्रोत्री हिने वेगवेगळ्या आऊटफिट्समधील फोटो शेअर केले आहेत.
यातील काही फोटोत ती हॉट, तर काही फोटोत खूपच सोज्वळ दिसत आहे.
रितिका हिने सन २०१५मध्ये प्रदर्शित झालेल्या 'स्लॅमबुक' या सिनेमातून अभिनयात पदार्पण केले होते.
यानंतर रितिकाने 'बॉयज', 'बकेट लिस्ट', 'बॉयज २', 'टकाटक', 'डार्लिंग' यांसारख्या सिनेमात काम केले.
रितिका 'हृदयी वसंत फुलताना' या आगामी मराठी सिनेमात झळकणार आहे.
विशेष म्हणजे, रितिका ही फक्त २१ वर्षांची आहे. या वयात तिने खूप लांबचा पल्ला गाठला आहे.