मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक जोडपे म्हणजे सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर.

सिद्धार्थ व मिताली यांच्या पॅरिस टूरची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा आहे.

यादरम्यानचे अनेक फोटो व व्हिडीओ हे जाेडपे त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करत आहेत.

अशात आता या जाेडप्याच्या पॅरिसमधील खास फोटोशूटची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

खरे तर व्हायरल फाेटाेंमध्ये हे जाेडपे एकमेकांना किस करताना दिसत आहेत, ज्यावर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.