अभिनेत्री मौनी रॉय ही सोशल मीडियावर तुफान सक्रिय असते.

मौनी तिच्या चाहत्यांसाठी दररोज कोणते ना कोणते फोटो शेअर करत असते.

यावेळी मौनीने साडीतील फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे, या साडीसोबत तिने ब्लाऊज परिधान केला नसल्याचे दिसते.

तिच्या या मनमोहक फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातलीय. तिच्या या फोटोंवरून नजर हटवणे कठीण झाले आहे.

मौनीच्या केसातील मांगटिका तिचा लूक परिपूर्ण बनवत आहे. तिने मांगटिकाशिवाय इतर कोणतेही दागिणे परिधान केले नाहीत.

मौनीच्या या फोटोला चाहते भरभरून प्रेम देताना दिसत आहेत. यावरून समजते की, चाहत्यांना तिचा हा लूक आवडला आहे.