दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि निर्माता विघ्नेश शिवम अनेक वर्षांच्या रिलेशनशीपनंतर ९ जून २०२२ रोजी लग्नबंधनात अडकले. 

त्यांनी लग्नाच्या एक महिन्यानंतर लग्नातील अनेक फोटो शेअर केले आहेत. 

या फोटोंमध्ये शाहरुख खान नयनतारा आणि विघ्नेशबरोबर गप्पा मारताना दिसत आहे. 

दिग्गज अभिनेते रजनीकांत यांनीही त्यांच्या लग्नासाठी हजेरी लावली होती. 

रजनीकांत या नवविवाहीत दाम्पत्यांना शुभेच्छा भेट देतानाही दिसले. 

रजनीकांत आणि शाहरुख व्यतिरिक्त अनेक मोठ्या मान्यवरांनी नयनतारा-विघ्नेश यांच्या लग्नाला हजेरी लावली होती.

नयनतारा-विघ्नेश यांच्या या फोटोंवर चाहते प्रेम व्यक्त करत आहेत.