‘चार दिवस सासूचे‘, ‘कळत- नकळत’, ‘हा खेळ सावल्यांचा’, या मालिकांमुळे घराघरात पोहोचलेले मराठमोळे नाव म्हणजे प्रिया मराठे.
प्रियाने ‘या सुखांनो या’ या मालिकेतून तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली होती.
या मालिकेनंतर तिने अनेक हिंदी, मराठी मालिकांमध्ये अविस्मरणीय भूमिका साकारत प्रेक्षकांच्यामध्ये मोठे स्थान निर्माण केले.
प्रिया नेहमी तिच्या भूमिकांमुळे आणि सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते.
अशात प्रियाने गुढीपाडवानिमित साडी नेसून सुंदर फाेटाे शेअर केले आहे, ज्यात अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.