‘सैराट’ फेम रिंकू राजगुरू ही सतत चर्चेत राहणारं व्यक्तिमत्त्व आहे.
तिच्या पोस्ट्स दरदिवशी इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.
तिचा चाहतावर्ग भलामोठा आहे.
तिचे चाहते तिच्या प्रत्येक फोटोला आणि प्रत्येक व्हिडिओला भरभरून प्रेम देतात.
अशातच रिंकूने फाेर व्हिलर चालवतानाचा एक व्हिडिओ शेअर केला असून यावेळी रिंकूने साडी परिधान केली आहे.