एका रात्रीत स्टार होण्याचं भाग्य खूप कमी कलाकारांना लाभतं. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री रिंकू राजगुरू होय.

रिंकू सध्या तिच्या लेटेस्ट फोटोंनी सोशल मीडियाचं तापमान वाढवत आहे.

लेटेस्ट फोटोंमध्ये रिंकू डेनिम जम्पसूट ड्रेसमध्ये दिसत आहे. यासोबतच तिने पांढऱ्या रंगाचा शर्टही परिधान केला आहे.

या फोटोत वेगवेगळ्या पोझ देत रिंकू चाहत्यांना घायाळ करत आहे.

रिंकूने 2016 मध्ये 'सैराट' या 100 कोटींहून अधिक रुपयांची कमाई करणाऱ्या सिनेमातून अभिनयात पदार्पण केलं होतं.