छोट्या पडद्यावरील ‘पिंजरा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी  अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे.

छोट्या पडद्यासह मोठ्या पडद्यावरही संस्कृतीने आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे.

मालिका विश्वापासून सुरु झालेला तिचा हा प्रवास आता चित्रपटांपर्यंत पोहोचला आहे.

2011मध्ये तिची ‘पिंजरा’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

या मालिकेत संस्कृतीने साकारलेली ‘आनंदी’ ही भूमिका प्रेक्षकाच्या मनात घर करून बसली.