अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिने तिचे नवीन अंदाजातील फोटो शेअर केले आहेत.

यामध्ये तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तिने वेगवेगळ्या पोझ दिल्यात.

संस्कृतीच्या या भन्नाट अदांवर तिचे चाहते फिदा झाले आहेत.

संस्कृतीबद्दल बोलायचं झालं, तर तिने सन २०११मध्ये 'पिंजरा' या टीव्ही मालिकेतून कारकिर्दीची सुरुवात केली होती.

पुढे तिने सन २०१४मध्ये रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. 'माकडाचं लग्न' हा तिचा पहिला मराठी सिनेमा होता.

ती आतापर्यंत 'शॉर्टकट', 'शिनमा', 'दमलेल्या बाबाची कहाणी', 'सर्व लाईन व्यस्त आहेत' यांसारख्या सिनेमात दिसलीये.