सारा अली खान ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
आपल्या दमदार अभिनयाने आणि बोल्डनेसने तिने सिने जगतात स्वतः ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सारा अली खान तिच्या अभिनयाइतकीच लूकसाठी आणि बोल्डनेससाठीही सिनेसृष्टीत विशेष प्रसिद्ध आहे.
साराचे अनेक बोल्ड फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
सध्या साराने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला आहे.