आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. सोशल मीडियावरही एकामागे एक लग्नाचे फोटो समोर येत आहेत, जे खूप व्हायरल होत आहेत. आता याच दरम्यान अभिनेत्री करिश्मा कपूरने (Karishma Kapoor) चुलत भाऊ रणबीर कपूरच्या लग्नाचे काही खास फोटो इंस्टाग्रामवर चाहत्यांसह शेअर केले आहेत. मात्र आता हे फोटो समोर येताच करिश्मा कपूरच्या लग्नाच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत.
करिश्मा कपूरवर पडला नवरीचा कलिरा
आलिया भट्ट-रणबीर कपूरच्या लग्नात अभिनेत्री करिश्मा कपूरचा जल्लोष पाहण्यासारखा होता, जेव्हा नवरीबाई आलियाचा कलिरा तिच्या अंगावर पडला. करिश्माने याच विधीचे फोटो सोशल मीडियावर फॅन्ससोबत शेअर केले आहेत. फोटोंमधील करिश्मा कपूरचे एक्सप्रेशन्स खूप पसंत केले जात आहेत. समोर आलेल्या फोटोंमध्ये करिश्माने हातात कलिरा पकडून पोझ दिली आहे. (wedding bells for karisma kapoor as alia bhatt kaleera fells on karisma inside photos viral)
शेअर केले फोटो
इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत करिश्माने लिहिले की, “इन्स्टाग्राम VS रिअॅलिटी. कलिरा माझ्यावर पडला मित्रांनो!” पहिल्या फोटोमध्ये करिश्मा तिच्या अंगावर पडलेला कलिरा कॅमेरामध्ये दाखवत आहे आणि एक सुंदर पोझ देत हसत आहे. पुढच्या फोटोमध्ये सर्वांची मजा दिसत आहे. यामध्ये करिश्मा कलिरा पकडून आनंदी झालेली दिसत आहे. तिच्या आजूबाजूचे इतर लोक देखील उत्साहित दिसत आहेत. यामध्ये रणबीरची बहीण रिद्धिमा कपूर साहनी, चित्रपट निर्माता करण जोहर आणि आलियाच्या मैत्रिणी देखील दिसत आहेत.
कलिरा पडणे म्हणजे काय?
पंजाबी विवाह विधींमध्ये, वधू बांगडीसह कलिरे घालते आणि नंतर ती तिच्या बहिणी आणि मैत्रिणींच्या डोक्यावर आपले मनगट हलवते. हा कलिरा जिच्यावर पडेल, पुढच्या वेळेस तिचे लग्न होणार असे मानले जाते. अशा परिस्थितीत, या मान्यतेनुसार, लवकरच पुन्हा एकदा कपूर कुटुंबात बँड बाजा वाजू शकतो आणि करिश्मा नवरी बनू शकते.
रणबीर आलियाचा लूक
आलियाने तिच्या लग्नात सुंदर ऑफ व्हाइट आउटफिट परिधान केला होता. त्याचवेळी तिचा पती रणबीरने तिच्या आउटफिटशी जुळणारी शेरवानी घातली होती. १३ एप्रिलपासूनच आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली होती. पहिलं त्यांच्या घरामध्ये गणेशपूजा केली गेली. यानंतर दोघांनी जवळच्या मित्रांमध्ये मेहंदी आणि हळदीची विधी केली. यानंतर त्यांचे लग्नही अगदी जवळच्या नातेवाईकांमध्येच झाले.
हेही वाचा