Sunday, June 1, 2025
Home बॉलीवूड धक्कादायक; परेश रावल यांनी सोडला आगामी हेरा फेरी ३; हे मोठे कारण आले समोर…

धक्कादायक; परेश रावल यांनी सोडला आगामी हेरा फेरी ३; हे मोठे कारण आले समोर…

बॉलीवूडमधील सर्वात प्रतिष्ठित विनोदी चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘हेरा फेरी’चा तिसरा भाग बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. चाहते राजू, श्याम आणि बाबू भैया या तिघांच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण आता चाहत्यांना एक मोठा धक्का बसला आहे.

अभिनेता परेश रावल यांनी ‘हेरा फेरी ३’ चित्रपट सोडला आहे. ते आता त्यांच्या प्रसिद्ध पात्र बाबूरावच्या भूमिकेत चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसणार नाही. ही बातमी येताच चाहत्यांना धक्का बसला आहे.’बॉलीवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, सर्जनशील मतभेदांमुळे परेश रावल यांनी चित्रपट सोडला आहे. तो चित्रपटाच्या पटकथेवर खूश नव्हते, म्हणून त्यांनी चित्रपट सोडणेच योग्य ठरवले. वृत्तांनुसार, परेश रावल या सिक्वेलबद्दल खूप गोंधळलेले होते आणि शेवटी त्यांनी त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

आणि नागीण सिझन ७ च्या प्रदर्शनाची तारीख ठरली; या दिवशी प्रसारित होणार एकता कपूरचा कार्यक्रम… 

हे देखील वाचा